Breaking News
Loading...
Wednesday, 15 October 2008

Info Post


जाणीव झाली मला अचानक, माझ्या अस्तित्वाची
कालच तुटली भ्रम माया ती, खोट्या कवित्वाची

उगा गिरवले शब्द, तयाला कविता कसे म्हणावे
नाही मात्रा, वृत्त जाणतो, कसले यमक जुळावे

काल पाहिले तेज जयांचे, वांगमय "नशीब" लिहते
गणित पाळते काव्य, शब्द-ओळीचा हिशोब लिहते

आशयपूर्ण अन नियमबद्धही, काव्यनिर्मिती होते
ओळ तोड़ता एक, सहजबघ नविन कविता होते

भाषेवरचा हक्क असा की, शब्द शाईचा दास
विषय अशक्य सहज वाहतो, ज्ञानेश्वरीचा भास

टाक जयांची लिहते कविता, भविष्य घेउन "वाह!" ची
चाल जयांची काळीज कोरे, शब्द आयुधे टोची

अंधरुढी ज्या काल वाटती, आज उमगले योग्य
उंच कपाळी, "खरे" वाटते, फ़ळफ़ळते सौभाग्य..

वेळच नाही मजला आता, नविन निर्मिति नाही
समजुन, वाचून, शिकणे कविता, उपर नीती नाही

उगा साचतील माझ्या कविता, फेस सागरावरती
दूरून बघावा, वांगमय सागर, कवि-कव्यांची भारती....

0 comments:

Post a Comment