Breaking News
Loading...
Sunday, 26 October 2008

Info Post
रोजच्या हवेत गारवा असतो तुझ्या स्पर्शाचा,
हवेतील गारवा तुझाच की तो स्पर्श माझ्या स्वप्नांचा?
न जाणो के समजू या सम्भ्रमावस्थेला!
दूर क्षितिजावर तारा लुकलुकतो,
मला वाटत तूच तो,
जो माझ्याकडे पाहून हसतो!
वेलीवर गोंडस फूल फुलत,
त्यातही मला तुझ प्रतिबिम्ब दिसत!
वेगाने दौडतोय वारू मनाचा,
न जाणो के समजू या सम्भ्रमावस्थेला!
तू खरच आहेस की .......
कल्पनाच ती माझी?
पण नाही तू आहेसच...... कारण,
मला जाणवलायस तू,
माझ्या आजुबाजुला,
मी बोललेय तुझ्याशी,
मी हसले तुझ्या बरोबर,
मी रागावलेय तुझ्यावर,
मी रडलेय रे तुझ्या खांद्यावर,
मग तू आहेस तरी कुठे?

सांग तू आहेस तरी कुठे ....... कारण,
आजही रोजच्या हवेत गारवा असतो फक्त तुझ्याच स्पर्शाचा!!

0 comments:

Post a Comment