Breaking News
Loading...
Sunday, 26 October 2008

Info Post
_./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.,.
*•. .•* दिपावळीच्या मंगलमय शुभेच्छा
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•..,.•¤**¤•.,.


आली सुमंगल दिवाळी आली
नांदी ही प्रकाशपर्वाची झाली
करत सुखाची रोषणाई आली
दु:ख तम दूर पळती झाली
आली झगमगीत दिवाळी आली..

आकाशकंदील सजला दारी
तनमन सजवी उटणं सुगंधी
अंगणी शोभे रम्य रांगोळी
पणत्यांत तेवे मोद वाती
आली साग्रसंगीत दिवाळी आली..

पंगतीस प्रियजनही जमली
भरला खमंग फराळ ताटी
फटाके मोह सुजाण आवरी
निसर्ग रक्षण ठेवी ध्यानी
आली मिलनपर्व दिवाळी आली..

राहो प्रसन्न सदा लक्ष्मी
घर उजळो कुबेर गृहापरी
शुभेच्छा ह्या लख्ख सोनेरी
घेऊन खास आपल्यासाठी
आली शुभेच्छुक दिवाळी आली..

0 comments:

Post a Comment