Breaking News
Loading...
Friday 24 October 2008

Info Post


आयुष्यात चालताना माणसाला
साथ हवी असते
म्हणुन तो लग्न करतो
लग्न कसले एकप्रकारे विघ्नच करतो

नाही संसाराची जाण
नाही सारं सांभाळण्याचं भान
गळ्यात पडले म्हणुन रेटत असतो
संसाराचा गाडा चालवत असतो

लग्न म्हणजे काय ?
याचं कुणाला आहे काय
लोक करतात म्हणुन आपणही करावं
असं नाही तर तसं रडून पहावं

भांडी-कूंडी, मूलं-बालं
याला तो संसार समजतो
यातच सारं जीवन मौजमजेत घालवतो

लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला
की समुद्राच्या वालुचा संसार वाटला
आलं मनात तर मोडून दिला
नाहीतर भातुकली समजुन सोडून दिला

संसार म्हणजे काय ? लग्न म्हणजे काय?
हे समजावून दाखवायची आली आहे वेळ
दोन जीवांचा खेळ करून मिलनाचा मेळ
विश्वास आणि प्रेम याची करावी गोड घालमेल

0 comments:

Post a Comment