Breaking News
Loading...
Saturday, 11 October 2008

Info Post
हो मी ऐकलंय
तिला जन्म घेण्या आधीच मारताना
एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार करताना

हो मी ऐकलंय
न ऐकताच तिच्या भावना चिरडून टाकताना
नकलतच तिच्या हृदयावर आघात ज़लेला

हो मी ऐकलंय
तिच्या स्वातंत्र्यावर रूढ़ी परंपरेचा पगडा टाकताना
संस्कारच ओजा म्हणुन नावडता संसार रेटाताना

हो मी ऐकलंय
स्त्री म्हणुन जन्म घेताना जणू पापच केलय
आधी आई बापाचा नंतर नवरायाच्या
मग मुलांच्या हातातला खेलन होताना

0 comments:

Post a Comment