Breaking News
Loading...
Friday, 17 October 2008

Info Post


खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावी
आपणही मग तिच्या खांद्यावर हात टाकून
तिला एक गंमत सांगावी

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी
लटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावी
आणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
आपले सगळे सिक्रेट जाणणारी
जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावी
आई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावी
हातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावी
अन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाही अधिक जवळची व्हावी

0 comments:

Post a Comment