Breaking News
Loading...
Tuesday 29 December 2009

Info Post
सातव्या मजल्यावरून
खाली बघताना
सगळ्या गाड्यांमध्ये ती
तेवढीच जागा
रिकामी असते पार्किंगची,
ठसठशीतपणे
उठून दिसणारी.

त्याला Airport वर सोडून
आल्यावर
मी गाडीचा सौदा
केला होता,
आता एकटेपणाबरोबर हा सौदा,
नमाझी अली रखवालदार सांगत होता
गुढग्यावर बसून,
" वहा कोई गाडी नही लगाता,
कहते है,
नापाक जगह है !
XXXX साले,
मी खिन्नपणे हसतो.

साब कुरिअर आया है !
तीन,चार,पाच व सहा
प्रकाशतिरीपा लांघत
मी घरात,
box च्या आत बटनाएवढी
राखी, लाल रंगातली,
" ह्यावेळी यायला जमणार
नाही म्हणून कुरिअरने पाठवली.......
पुढच न वाचताच
मी डायनिंग टेबलवर बसतो,
भिंतीवरची राजारवीवर्म्याची
दमयंती
कुणाच्यातरी प्रतीक्षेत
माझ्याकडे बघत असते.

दारातून आत सरकलेल्या
प्रकाशकवडश्याला
खोकला थोडा हेंदकाळतो
आत जावून मी
पांघरून नीट करतो,
डब्यात कारल्याची भाजी
"ती" गुळ घालायची
ह्यात नसतो,
मी छद्मीपणे हसतो,
ताट करतो
एकटं.

0 comments:

Post a Comment