Breaking News
Loading...
Thursday, 29 January 2009

Info Post


श्वास घुसमटतोय तरी
श्वास मी अजून सोडला नाही,
जीव घुटमळतोय तरी,
विश्वास हा अजून मोडला नाही!!

बाहेर अन्धार असला तरी
प्रकाश माझ्यात दडला आहॆ,
रात्र ही काळी सरणार आता
सूर्य मनातला सान्गत आहे!!

अन्धार आहे हा अद्न्यानाचा,
अन्धार आहे हा अपयशाचा,
स्वत:मधल्या 'मी'ला ओळखा
राजमार्ग बनवा विकासाचा!!

निश्चय करा यापुढे कधी अश्रू ढाळणार नाही,
निश्चय करा यापुढे कधी हातपाय गाळनार नाही,
'त्याने' तुम्हाला बनवल,त्याचा अन्श तुमच्यात आहे,
निश्चय करा यापुढे 'त्याला' लज्जित करणार नाही!!

0 comments:

Post a Comment