Breaking News
Loading...
Tuesday, 23 December 2008

Info Post


अद्वैत ....... तुझे नि माझे !!

रातचांदण्यांची ओंजळ,
रोज तुला देइन,
जेव्हा माझ्या राजा,
मी तुझी होइन !!

चन्द्र असेल साक्षीला,
चांदण्याच्या गर्दित,
तुझे नि माझे अद्वैत होइल,
जेव्हा येइन मी तुझ्या मिठीत !!

येइल अंगावर शिरशिरी,
पडेल गुलाबी क्षणांचा सडा,
त्यासाठी आधी माझ्या हाती,
भरायला हवा हिरवा चुडा !!

मिणमिणता दिवा,
मालवून येशील तू माझ्या समीप,
भान हरवून बघशील सख्या तू,
मि ही मग लाजेन अमाप !!

घटित अघटित नसेल ते,
मर्यादा तरी असेल कशी,
ती तर असेल केवळ,
जन्मोजन्मीची ख़ुशी !!

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.