Breaking News
Loading...
Tuesday, 23 December 2008

Info Post


एकच आस ........ !!
हट सोड आता सखे,
भावना मला समजू दे,
माझ्याही मनात एकदा,
वसंत फुलू दे !!
ओठांच्या पाकल्या,
विलग होऊ दे,
" मी तुला आवडतो",
हे मलाही ऐकू दे !!
मलाही तुझ्या,
स्वप्नी येऊ दे,
जवळ घेता लाजलेली तुला,
मलाही पाहू दे !!
नजर तुझी ,
माझ्यावर पडू दे,
शीतल चांदणे आता,
माझ्यावरही बरसू दे !!
एकच आस,
माझ्या उरी,
तू माझी अन,
मी तुझा होऊ दे !!

0 comments:

Post a Comment