Breaking News
Loading...
Tuesday, 18 November 2008

Info Post


कधीतरी तुझी मुकी होइल वाणी
आठवतील तुलाही आपली सोबत गायलेली गाणी

दाटून येइल सखे तुझाही कंठ
ना दवा कामा ना मिळेल तुला सुंठ
शब्द होतील मुके मुके
अन डोळ्यात दाटेल पहटाचे धुके
हात जाईल पदराला पुन्हा पुन्हा
सांगशील का गेलीस सोडून एकट्याला
झाला काय गुन्हा ?
थांब तेंव्हा रडू नको
अश्रुना गाळु नको
एकटी राहू नको
जरा गच्ची वर जा
आभाळ बघ चांदण्या मोज
आठवत तुला त्या आपल्या नक्षत्रा पासून
उजवी कड़े तुझ अन डावी कड़े माझे ...
आपण वाटुन घेतलेल आभाळ
रोज रात्री आपण मोजयचो त्या ता-यांना..
आजही पुन्हा मोज
बघ तुझ्या आजही तितक्याच भरतील
माझ्या मात्र एक एक करून गळुन चालल्यात
तुझ्या सा-या विश पूर्ण होण्यासाठी ...
आता हस पुन्हा एक विश कर ...
बघ तारा तुटताना दिसेल ...

0 comments:

Post a Comment