Breaking News
Loading...
Friday 14 November 2008

Info Post
आज १४ नोव्हेंबर..पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिन..बालदिन..

वयाने कित्तीही मोठे झालो तरी आपलं ह्रदय मात्र बेफाम तरुण असण्यापेक्षा चक्क
लहान मुलासारखं निरागस असावं असं मला वाटतं.
हसत खेळत,धडपडत,पडून उठत या जगात वावरावं.प्रत्येक गोष्ट नव्या उत्सुकतेने
शिकावी,समजावी.
जीवनातील संकटांमुळे कोरड्या होऊ पाहणार्‍या मनाची जगण्याची तहान संपू नये,ती
कायम रहावी.

_./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.
*•. .• बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•.

** ' आजही ' , मी लहान आहे.. **


नाद हे खुळे सुटतील कसे ?
कारण..' आजही ' ,

खाते चॉकलेटस
चाखत जरी सत्य आहे..

खुडते गुलाब
बोचत जरी काटे आहे..

धावते वार्‍यासवे
विस्कटत जरी केस आहे..

नाचते पावसांत
कोसळत जरी विजा आहे..

खेळते दोस्तांत
दिसत जरी मुखवटे आहे..

हसते उत्फुल्ल
उरात जरी वेदना आहे..

फिरते नदीतीरी
फितुर जरी किनारा आहे..

रमते परीकथांत
फसवे जरी सुखांत आहे..

झोपते निवांत
तुटत जरी स्वप्नं आहे..

जगते भरभरुन
कळत जरी शेवट आहे..

नाद हे खुळे सुटतील कसे ?
कारण..' आजही ' ,

मी लहान आहे..
मला जीवनाची तहान आहे..


- स्वप्ना

0 comments:

Post a Comment