Breaking News
Loading...
Wednesday, 28 December 2011

Info Post
हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
स्वप्नातली वाट ही मोकळी असते
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असतात उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
असेल जर कुणी मस्त.

याच त्या वयामध्ये,
विश्रांतीला वेळ नसतो.
उमेदीच्या गावावारती,
प्रयत्नांचा गस्त असतो.

हेच तर ते वय असतं,
जिथे नेमकं मन फसतं.
नजरेतले कळता भाव,
लाडे लाडे गाली हसतं.

नेमके याच वयात,
कुणी लिहिली ज्ञानेश्वरी,
किंकाळी फोडण्या दिल्ली दरबारी,
कुणी होते पुरे व्यस्त.

याच त्या कोवळ्या वयी,
देशासाठी स्वीकारली फाशी,
वाचवण्या कुणी आपली झाशी,
भय फेकुनी कंबर कसत.

0 comments:

Post a Comment