Breaking News
Loading...
Thursday, 11 February 2010

Info Post
तू गेलास निघून पण
भेटत रहा असाच अधून मधून
कोवळ्या पहाटे पडलेल्या
एखाद्या गोड स्वप्नातून
सूर्याच्या त्या सोनसळ्या
रेशीम किरणांतून

झर्यातून खळ-खळत
वाहणाऱ्या पाण्यातून
बागेतल्या कोकिळेने
गायिलेल्या गाण्यातून

भर दुपारी दाटलेल्या
सावळ्या घनुतून
बरसून गेल्यावर
शहारलेल्या तनूतून

अंधारून आलेल्या
श्यामल रंगातून
मोहवून टाकणाऱ्या
रातराणीच्या गंधातून

त्याच पुन्हा
विसरून गेलेल्या आठवणीतून
तू निघून गेल्याची जाणीव देणाऱ्या
भिजलेल्या पापणीतून.......

माझ्या येणाऱ्या जाण्याऱ्या
कोरड्या उष्ण श्वासातून
तुझ्याविणा "जगण्याच्या"
नुसत्याच भासातून

भेटत रहा असाच अधून मधून
भेटत रहा असाच अधून मधून

0 comments:

Post a Comment