Breaking News
Loading...
Tuesday 16 February 2010

Info Post
तू सोडून गेलीस,
आणि हरवल्या माझ्या चांदराती
पसरला सारा मिट्ट काळोख,
उरल्या केवळ अमावस्येच्या राती

निद्रा गेली केव्हाच उडोन,
कूस बदलून मी हैराण
स्वप्न नगरी मज तेव्हापासून
कधीच ना भेटली ,
सारे चित्र झाले वैराण

प्राजक्त मनीचा आता न फुलतो,
ना फुलते कधीच रातराणी
जरी घालतो मी रोज त्यांना,
डोळ्यांमधील आसवांचे पाणी

लोपली केव्हाच येथली ,
आनंदाची मंजुळ गाणी
हृदयपटावर माझ्या आता ,
वाजते केवळ विराणी

सारेच आता मनाला ,
अंधारलेले भयाण क्षण
आधार केवळ एक मनातील,
मिणमिणती तुझी आठवण

0 comments:

Post a Comment