Breaking News
Loading...
Saturday 21 January 2012

Info Post

हे तरुण रात्री तुला पाहुदे मन भरूनी आज,
काय माहित कोण जाणे
उद्या कोणी पाहिला?

तू उधळ गं तुझे रंग
आकाश भरून
साठवू दे आजच ते ही डोळ्यांत कायमचे
काय माहित उद्या कोणी पाहिला?

तु दावतेस आशा मला
परत पाहण्याची उद्या,
पण काय सांगू तुला,
त्या विधात्याच्या 'मनातला
डाव' कोणी पाहिला?

हो ना गं तू तरूण अजून
तुला आज डोळ्यांत साठवू दे.
एवढीच इच्छा माझी तू आज पूरी होऊ दे

तू उधळ तुझे रंग मी बघायला तयार आहे
जरी सगे-सोयरे माझे
निद्रेत घायाळ आहे
काय माहीत उद्या कोणी पाहिला?

ए चांदणे तू मला का गं आज एकटी खुणवतेय अशी ?
बोलव ना तुझ्या त्या सोबत्याला
का तोही गेला तुला सोडून आज
माझ्या...माझ्या. लाडक्या प्रिये सारखा?
परत येण्याचं आश्वासन देऊन
'उद्या'ची आशा दावून!

माझी 'उद्या' आज संपण्यावर आली गं
म्हणून पाहतोय तुला आज माझ्या प्रियेच्या रूपानं
काय माहित कोण जाणे
उद्या कोणी पाहिला?
                                   ..........मुकेश बिह्राडे

0 comments:

Post a Comment