Saturday, 1 May 2010

Info Post
थांब सख्या सोड हात सरली रे चांद रात
आलो किती दूरवर उघड नयन टाक नजर

तुडवीत आलो सख्या रे किर्र काजळी रात
पडता कानी तुझी रे हळवी मधुर साद
परी आता जाऊदे रे सोड ते कंकणीकर
आलो किती दूरवर उघड नयन टाक नजर

फुलफुल उमलले आली पौर्णिमा नभात
लक्ष लक्ष चांदणे दाटले तुझ्या माझ्या मनात
परी आता जाऊ दे रे नभी आला भास्कर
आलो किती दूरवर उघड नयन टाक नजर

झूलवलेस हिंदोळ्यात शरदाच्या चांदण्यात
उतरली जणू वेणू तुझीच रे अंबरात
परी आता जाऊ दे रे विरले माझे नुपूर
आलो किती दूरवर उघड नयन टाक नजर

तुझसाठी सख्या रे मागे सांडले नातगोत
देशील ना रे हरघडी प्रीत अशी ओतप्रोत
नको कधी देऊ सख्या पानगळीचा शिशिर
आलो किती दूरवर उघड नयन टाक नजर

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.