Breaking News
Loading...
Friday 5 March 2010

Info Post
जडावल्या पापणीला झोपेचे डोहाळे
अंधातरी स्वप्नाना पापणीचे झोपाळे

झोपाळ्यात चंद्राला हलकेच जोजवे
स्पर्षाच्या भाषेत हर्षाचे सोहळॆ

मनाच्या आभाळी चांदण्याचे सडे
चांदणी सड्यात भावनांचे कडे

भावनांच्या कड्यात झुले मोरपिसारे
अंधारा पल्याड गोड सुस्कारे

पहाट वारा पांघरुण घाले
सख्यासोबती तिचे हितगुज चाले

किनार जरतारी गालात आली
ओठाची दुमड विलग झाली

चेहरा झाकला काळ्या कुंतले
पहाट आभा लोचनी बोले

लोचनाची भाषा लोचनाला कळे
स्वप्नपरीचे होते जग निराळे

जगात तिच्या सुंदर आरास
स्वनाचे होते जग ते खास

कल्पी जोशी

0 comments:

Post a Comment