Breaking News
Loading...
Thursday, 19 February 2009

Info Post
कसे समजावू या मिरेला,
कान्हा नाही भेटला या राधेला,
मैय्यालाही नाही माहित,
चित्तचोर कुठे गायब झाला !!

गवळणी सगळ्या म्हणती,
चित्तचोर त्यांचाच सांगाती,
कसे समजावू तुम्हाला,
कान्हाची तर या राधेवरच प्रीती !!

मिरे बघ जरा निरखून,
झुला नाही तो रिकामा,
राधेसवे तो कान्हा,
वाजवी तिथे पावा !!

गवळणी वेडया, मिराही वेडी,
त्यांना मुळी कळतच नाही,
राधेचा कान्हा अन कान्हाची राधा,
जन्मोजन्मीची वेडी !!

0 comments:

Post a Comment